एटीएमद्वारे पैसे काढून देण्याच्या बहाण्याने बनावट एटीएम कार्ड देवून खात्यातील पैसे चोरले
पेठकिल्ला कुरणवाडी येेथे राहणारे प्रितम मांडवकर हे हातखंबा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेले होते त्यावेळी तेथे असलेल्या अज्ञात आरोपीने त्यांना मदत करण्याच्या बहाण्याने मांडवकर यांचे एटीएमकार्ड बदलले व आपल्याकडील डुप्लीकेट कार्ड त्यांना दिले. त्यानंतर मांडवकर यांच्या एटीएमकार्डाचा उपयोग करून बँक ऑफ इंडिया गाडीतळ येथील खात्यातून फिर्यादी मांडवकर यांचे २१ हजार रुपये काढून घेतले व त्यांची फसवणूक केली.
www.konkantoday.com