रत्नागिरीतील उघडी गटारे पादचाऱ्यांसाठी बनताहेत धोकादायक

रत्नागिरी शहरातील विविध ठिकाणी असलेले उघडय़ा गटारांमुळे लोकांचा जीव धोक्यात येत आहे.कोहिनूर कॉम्प्लेक्स, नाचणे रोड येथील हे बिल्डिंग बाहेरचे फूटपाथ वरील गटार उघडे असल्याने रिमझिम पावसात लाइट गेल्याने एक वयस्कर काका गटारात पडले, तिकडेच असणाऱ्या अंकिता ऍग्रो दुकानातील आणि बॉय झोन दुकानातील मुलांनी प्रसंगावधान दाखवून काकांना सुरक्षित बाहेर काढलं.सध्या तिकडेच असणाऱ्या व्यापारी वर्गाने ते गटार तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे अशी नागरिकांची मागणी आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button