
रत्नागिरीत आज तबला सोलो, जुगलबंदी रंगणार
रत्नागिरीतील र्हिदम ऍरेंजर मारूतीराव कीर यांचा नातू रोहन सावंत याच्या वाढदिवसानिमित्त आज १६ ऑक्टोबर रोजी तबला सोलो व जुलगबंदी २०१९ हा कार्यक्रम रत्नागिरीत रंगणार आहे. राष्ट्रपती पुरस्कार फर्स्ट लेडी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या प्रथम प्रोफेशनल महिला तबला वादक अनुराधा पाल यांचा तबला सोलो पाहण्याची संधी रत्नागिरीकरांना मिळणार आहे. हा कार्यक्रम आज १६ रोजी सायंकाळी ५.३० वा. शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात रंगणार आहे.
www.konkantoday.com