महाराष्ट्र कॅरम असो. निवडणूक,रत्नागिरीचे प्रदीप भाटकर उपाध्यक्ष तर अजित सावंत खजिनदार
महाराष्ट्र कॅरम असो.ची निवडणूक नुकतीच काशिनाथ धुरू हॉल, दादर, मुंबई येथे पार पडली. या निवडणुकीत रत्नागिरी जिल्हा कॅरम असो.चे अध्यक्ष श्री प्रदीप भाटकर यांची महाराष्ट्र कॅरम असो.चे उपाध्यक्ष म्हणून तर रत्नागिरी जिल्हा माजी सचिव श्री अजित सावंत याची खजिनदार म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे शासकीय परिषदेवर चिपळूणचे राष्ट्रीय पंच श्री साईप्रकाश कानिटकर यांची नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र कॅरम असो.च्या महत्त्वाच्या अशा दोन पदांवर रत्नागिरी जिल्ह्याच्या दोघांची एकदम निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या निवडीबद्दल म्हाडा अध्यक्ष मा.उदय सामंत, सह्याद्री शिक्षण संस्थेचे श्री शेखर निकम, उद्योजक श्री किरणशेठ सामंत , सुचयअण्णा रेडीज आदी प्रभृतींनी अभिनंदन केले आहे.
महाराष्ट्र कॅरम असो.च्या अध्यक्षपदी पालघरचे उद्योजक व जेष्ठ कॅरमपटू श्री जीतूभाई शहा तर कार्याध्यक्ष म्हणून पुण्याचे श्री भारत देसाडला यांची निवड झाली आहे. मुंबईचे श्री यतीन ठाकूर यांनी श्री. अरुण केदार यांचेकडून सचिवपदाचा कार्यभार स्वीकारला.
गेल्या काही वर्षातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेळाडूंच्या कॅरम मधील प्रगतीची दखल घेऊन तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे कॅरममधील काम पाहूनच रत्नागिरी जिल्हा कॅरम असो.ला हा बहुमान प्राप्त झाला आहे.
रत्नागिरी जिल्हा कॅरम असो.च्या कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केल्यामुळेच रत्नागिरी जिल्ह्यात कॅरमची एवढी प्रगती होत आहे आणि त्यामुळेच हा बहुमान आपल्याला मिळाल्याचे श्री प्रदीप भाटकर यांनी याबद्दल बोलताना सांगितले.तसेच श्री मिलिंद साप्ते, नितीन लिमये, राहुल बर्वे, सुरेन्द्रशेठ देसाई,मोहन हजारे,विवेक देसाई , इ.यांचे विशेष सहकार्य लाभत असल्याचेही त्यांनी सांगितले.