कोकणवर भगवा झेंडा फडकवाल याची खात्री -उद्धव ठाकरे
21 तारखेला तुम्ही कोकणवर भगवा फडकवाल याची मला खात्री आहे असे उद्गागार शिवसेना कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरे यांनी कणकवली येथील प्रचारसभेत बोलताना काढले.शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांनी पूर्वीचुक केली नसती तर ते याआधीच आमदार झाले असते. कणकवलीमध्ये भाजपाने कट्टर कार्यकर्त्याला उमेदवारी दिली असती तर आम्ही त्याच्या प्रचाराला आलो असतो.युतीचे सरकार आल्यानंतर राज्यात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार.माला ७/१२ कळत नाही पण मला दुसऱ्याची जमीन हडपही करता येत नाही असा टोला त्यांनी लगावला.दहा रुपयात जेवण देण्याच्या निर्णयावर टीका करणाऱ्यांचा त्यांनी समाचार घेतला.दहा रुपयात जेवण थाळी आम्ही देणारच ही थाळी मातोश्रीवर करणार काय अशी माझ्यावर टीका करणारे ते मातोश्रीवर जेवलेल्या मिठाला जागले नाही त्यांना त्यातलं काय कळणार.विनायक राऊत,वैभव नाईक यांनी सिंधुदुर्गातील गुंडागर्दी मोडित काढली असे ठाकरे यांनी सांगितले.भाजप आमचा मित्र आहे त्याचे वाईट होऊ नये ही आमची इच्छा.मित्राच्या घरात चोर शिरत असेल तर मित्राला सावध करणे हे माझे कर्तव्य आहे असेही त्यांनी सांगितले.आम्हाला विनाशकारी विकास नको आहे कोकणची राखरांगोळी करणारा नाणार प्रकल्पाला नकोच आहे.असेही ठाकरे यांनी सांगितले.
www.konkantoday.com