मंगळसूत्र चोरीच्या संशयावरून कामवाली विरुद्ध गुन्हा दाखल
हातखंबा येथील राहणाऱ्या विद्या सावंत यांच्या घरातील मंगळसूत्रात चोरल्याच्या संशयावरून सोनाली पावसकर या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीही फिर्यादीकडे घरकाम करते यातील फिर्यादी यांनी आपल्या गळ्यातील मंगळसूत्र रात्री बिछान्याखाली काढून ठेवले होते सकाळी ते मिळून आले नाही हे मंगळसूत्र सोनालीने चोरल्याचा संशय फिर्यादीने व्यक्त केल्यामुळे सोनालीच्या विरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे
www.konkantoday.com