राणे आणि शिवसेनेमधील कटुता संपावी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई-माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यामधील कटुता संपावी, असे स्पष्ट मत राज्याचे मुख्यमंत्री भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना नुकतेच दिले ते म्हणाले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबियांना अत्यंत आदराचे स्थान आहे त्यामुळे ही कटूता किती दिवस राहणार राणे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर बोलण्याचे टाळावे आणि त्यांच्यातील कटुता संपवावी अशा स्पष्ट शब्दात आपण त्यांना सांगितले अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वृत्त वाहिनी तील मुलाखतीत दिली.
www.konkantoday.com