
11 रोजी राज्यव्यापी ‘शाळा बंद’चा इशारा
अंशतः अनुदानित शिक्षकांच्या टप्पा वाढ मागणीसाठी किंबहुना 14 ऑक्टोबर 2024 च्या टप्पा वाढीच्या शासन निर्णयाच्या कार्यवाहीसाठी, निधी तरतुदींसाठी 8 व 9 जुलै रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.याच मागणीला राज्यातील अनेक शिक्षक, शिक्षकेतर संघटनांचा, शिक्षण संस्थांचा जाहीर पाठिंबा मिळत आहे.
या शाळा बंद आंदोलनाला महाराष्ट्र राज्य माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ यानेही लिखित पाठिंबा जाहीर केला आहे. नुसता पाठिंबा न देता संघटनेतर्फे 11 जुलै रोजी एकदिवसीय शाळा बंद आंदोलन करत संप पुकारला आहे. यामुळे सध्या शासन अडचणीत सापडले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाचे अध्यक्ष तानाजी माने, सचिव नंदकुमार सागर यांच्या स्वाक्षरीचे पत्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, शिक्षण सचिव, शिक्षण आयुक्त,शिक्षण संचालक, सर्व जिल्हाधिकारी यांना दिले आहे.