सध्या सर्वच क्षेत्रांमध्ये महिला आघाडीवर असल्याचे आपण पाहतो.परंतु रत्नागिरी जिल्ह्यातील मतदारसंघात फक्त एकमेव महिला उमेदवाराने आपला अर्ज भरला आहे.दापोली विधानसभा मतदारसंघातून स्वाभिमानी बहुजन संघ पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून सौ. सुवर्णा पाटील यांनी अर्ज भरला आहे. विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या जिल्ह्यातील एकमेव महिला उमेदवार त्या ठरल्या आहेत.सुवर्ण पाटील या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांनी असून त्या एमएस्सी ॲग्रिकल्चर आहेत.या मतदारसंघात एकूण २ लाख ८० हजार ४९६ मतदारांपैकी १लाख ४६ हजार ९९० महिला मतदार आहेत.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here