
पुण्याच्या रस्त्याच्या खड्ड्यात चक्क ट्रक गाडला गेला, पहा व्हिडिओ.
एका धक्कादायक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. जो पुण्यातील समाधान चौक परिसरातील असल्याचं सांगितलं जात आहे. इथे एका खड्यात संपूर्ण ट्रक पडला आहे. हे दृश्य पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल.दरम्यान जवळील सीसीटीव्हीमध्ये संपूर्ण घटना कैद झाली. या घटनेनंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.नशिबाने या घटनेत कुणी जखमी झालेलं नाही. खड्यात अडकलेल्या ड्रायव्हरला बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे.इमारतीच्या आवारात अचानक पडलेला हा खड्डा, साधारणपणे 25 फूट खोल आहे. ट्रकसह दोन दुचाकीही खड्ड्यात पडल्या आहेत.जवळील ड्रेनेज साफ करण्यासाठी हा ट्रक आला होता. तेथील जवळील इमारतीच्या खालून भूमिगत मेट्रो गेलीय आणि हा ट्राक याच मेट्रोच्या खड्यात पडला.ही इमारत 1925 साल जूनी असून त्याखालूनच 100 फूट मेट्रोचे भुयार गेले आहे. व्हिडीओत हे स्पष्ट दिसतंय की चेंबरचा खड्डा त्या भागात पडला आहे. ज्यामध्ये हा ट्रक पडलेला आहे. पालिकेचा साफसफाई करणारा ट्रक त्या ठिकाणी नालेसफाईसाठी आला असताना ही घटना घडली