
रघुवीर घाटात कोसळली पुन्हा दरड
खेड : तालुक्यातील खोपी गावातून सुरू होणाऱ्या रघुवीर घाटात रविवार दि. 7 रोजी पुन्हा दरड कोसळल्यामुळे घाट वाहतुकीसाठी बंद झाला आहे. कांदाटी खोऱ्यात वास्तव्य करणाऱ्या शेकडो लोकांसाठी उपयुक्त असलेल्या या घाटात सतत दरड कोसळणे, रस्ता खचणे या घटना घडत आहेत. येथे उपाययोजना न केल्यास मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे.