निवडणूक आचारसंहिता भंग तक्रारींची १०० मिनिटात दखल घेणार -जिल्हाधिकारी
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाली आहे. आचारसंहिता भंगाची तक्रार प्राप्त झाल्यानंतर ती भरारी पथकाकडे पाठविण्यात येईल
ही तक्रार प्राप्त झाल्यापासून भरारी पथक शंभर मिनिटात घटनास्थळी भेट देऊन त्यावर कार्यवाही करेल
अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यानी दिली आहे.ज्या नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी करायच्या असतील त्यांनी त्या निर्भयपणे नोंदवाव्यात असेही जिल्हाधिकाऱयांनी स्पष्ट केले आहे.
www.konkantoday.com