
लोटिस्मा आता अपरांत भूषण पुरस्कार देणार
चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वतीने या वर्षीपासून अपरांत भूषण हा नवा पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. हा पुरस्कार भूतपूर्व अध्यक्ष अप्पासाहेब जाधव यांच्या सामाजिक आणि साहित्यिक कार्याचा गौरव म्हणून त्यांच्या स्मरणार्थ वाचनालयातर्फे अपरांत भूषण या नावाने देणे देणार आहे. कोकणातील साहित्यिक सामाजिक कार्यकर्ते इतिहास संशोधक पर्यावरण क्षेत्र आदी विषयात लक्षणीय काम केलेल्या व्यक्तीला किंवा संस्थेला हा पुरस्कार देण्यात येणार आहे. पंचवीस हजार रुपये रोख सन्मान चिन्ह व मानपत्र पुरस्काराचे स्वरूप आहे .
www.konkantoday.com