कोकण रेल्वेचे टीसी किरण शिंदे यांच्या जागरूकतेमुळे बेपत्ता मुलगा सापडला

0
114

रोहा शहरातील सोळा वर्षांचा मुलगा अचानक घरातून निघून गेला होता .या मुलाचा फोटो वर्णन कोकण रेल्वेच्या नियंत्रण कक्षाने सर्व रेल्वे स्टेशन ,टीसी , रेल्वे सुरक्षा बल यांच्याकडे पाठवले होते.कोकण रेल्वेचे ड्युटीवर असलेले टीसी किरण शिंदे यांना सदर वर्णनाचा मुलगा दिसल्यावर त्यांनी या मुलाला आपल्या ताब्यात घेतले.त्यांचे सहकारी टीसी अनंत खेडेकर यांना बरोबर घेऊन त्यांनी कोकण रेल्वेच्या नियंत्रण कक्षाचे संपर्क साधला. त्यानंतर या मुलांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला. मुलाला मध्यरात्री त्या कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आले.शिंदे यांनी दाखवलेल्या जागरूकतेमुळे एका कुटुंबाला आपला तरुण मुलगा सुखरूप मिळाला.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here