भाजप उमेदवार नीतेश राणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मेळाव्यात ?
कणकवली संघातील भाजपाचे उमेदवार नितेश राणे यानी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला होता. यानंतर आज त्यांनी चक्क राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमीनिमित्त होणाऱ्या मेळाव्याला हजेरी लावली.
नितेश राणे यांचा या मेळाव्यामधील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. देवगडच्या जमसंड येथे दरवर्षी संघाकडून विजयादशमीनिमित्त संचलन केलं जातं. मात्र यावेळी कार्यक्रमातील नितेश राणे यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली.
www.konkantoday.com