
दापोलीतील भूकंप सदृश्य धक्के नेमके कशामुळे ?
दापोली शहराच्या काही भागात चार दिवसांपूर्वी भूकंप सदृश्य धक्के नागरिकांना जाणवले होते .याबाबत नागरिकांनी तक्रार केल्यावर प्रशासनाने यात लक्ष घालून तज्ज्ञ मंडळींना तपासणी करण्यास सांगितले होते. हे धक्के भूकंपाचे नाहीत असाही खुलासा प्रशासनाने केला होता. या भागातून गेलची गॅसची पाइपलाइन गेल्याने त्याचा याच्याशी काही संबंध आहे का यासाठी पाइपलाइन तपासण्याची सूचना करण्यात आली होती. त्याचा अहवाल अद्याप आला नसल्याने या धक्क्याचे नेमके कारण मध्ये स्पष्ट झालेले नाही .
www.konkantoday.com