सिंधुदुर्गात महायुती टिकली नाही ,शिवसेना भाजप समोरासमोर
रत्नागिरी जिल्ह्यातील भाजप मध्ये नाराज नेत्यानी बंडखोरी केली होती त्या सर्वांनी अर्ज मागे घेतल्याने रत्नागिरी जिल्ह्यात महायुती यशस्वी झाली असतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र भाजप सेना एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत अर्ज मागे घेण्याच्या दिवशीही अर्ज मागे न घेतल्याने या ठिकाणच्या लढती आता लक्षणीय झाल्या आहेत कणकवली मध्ये भाजपच्या नितेश राणे समोर शिवसेनेचे सतीश सावंत उभे आहेत तर कुडाळमध्ये शिवसेनेच्या वैभव नाईक यांच्यासमोर अपक्ष पण स्वाभिमान आणि भाजपचा पाठिंबा असलेले रणजित देसाई हे उभे आहेत. सावंतवाडीत विद्यमान आमदार दीपक केसरकर हे शिवसेनेचे उमेदवार असून यांच्यासमोर राजन तेली हे भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार उभे आहेत. याशिवाय माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर राष्ट्रवादीच्या तिकीटावर उभे आहेत .
www.konkantoday.com