तिवरे ग्रामस्थांसाठी आलेल्या पाण्याच्या टाक्यात खडखडाट
तिवरे धरण फुटीमुळे त्या भागातील अनेक पाणी योजना वाहून गेल्या होत्या त्यामुळे तीवरे गावासह चार गावात पिण्याचा प्रश्न निर्माण झाला होता धरण फुटल्याने जॅकवेल ही बंद आहेत जिंदाल कंपन्यांनी व खासदार विनायक राऊत यांनी ग्रामस्थांसाठी पिण्याच्या टाक्या दिल्या होत्या परंतु या टाक्यात पाण्याचा खडखडाट अाहे.प्रशासनाकडूनही टँकर उपलब्ध करून दिला जात नाही यामुळे या ग्रामस्थांची पाण्याची समस्या गंभीर झाली आहे व त्यांना केवळ झऱयाच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे.
www.konkantoday.com