सुट्टीच्या हंगामात कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाडी धावणार
काही दिवसांनी येणाऱ्या दीपावली सणासाठी व नाताळच्या सुटीच्या हंगामात कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या सर्व गाड्यांना प्रवाशांची मोठी गर्दी असते. यासाठीकोकण रेल्वेकडून प्रवाशांच्या सोयीसाठी २२ ऑक्टोबरपासून बांद्रा ते मंगळूर ही विशेष गाडी चालवण्यात येणार आहे.ही गाडी २२ ते २९ अॉक्टोबर व २४ ते ३१ डिसेंबर कालावधीत धावणार आहे.
www.konkantoday.com