निवडणूक प्रशिक्षणास अनुपस्थित,238 कर्मचाऱ्यांना बजावली नोटीस
विधानसभा निवडणूक 2019 साठी नियुक्त केलेल्या मतदान अधिकारी कर्मचारी यांच्या दिनांक 2 ऑक्टोबर २०१९ रोजी च्या प्रशिक्षणास गैरहजर राहिलेल्या व सातत्याने गैरहजर राहणाऱ्या 238 कर्मचाऱ्यांना जिल्हा निवडणूक अधिकारी रत्नागिरी सुनील चव्हाण यांनी लोकप्रतिनिधीत्व कायद्यांतर्गत कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. याचा आढावा घेतल्यानंतर या नोटीसा बजावल्या अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.13 ऑक्टोबर 2019 च्या दुसऱ्या प्रशिक्षण वर्गास उपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कारवाईबाबत सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल मात्र दिनांक 13 ऑक्टोबर रोजी च्या दुसऱ्या प्रशिक्षणास सुद्धा गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल. अशी सक्त ताकीद जिल्हा निवडणूक अधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली आहे.२६३ – दापोली विधानसभा मतदार संघातील 15, 264- गुहागर 12, 265-चिपळूण मधील 22, 266-रत्नागिरीत 131 आणि 267-राजापूर येथील 58 अनुपस्थित कर्मचाऱ्यांना आज कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्या आहे.प्रशिक्षणासाठी 8527 कर्मचाऱ्यांना बोलविण्यात आले होते.विधानसभानिहाय वापरण्यात येणारे मनुष्यबळ असे. 263-दापोली 1827, 264-गुहागर 1488, 265-चिपळूण 1573, 266-रत्नागिरी 1941 आणि 167-राजापूर 1698.
www.konkantoday.com