मित्र असल्याचे सांगून मोटारसायकल पळविली

उभी करून ठेवलेली मोटारसायकल आपल्याला मित्राने नेण्यास सांगितले असे खोटे सांगून अज्ञात चोरट्याने मोटारसायकल लांबवली.दापोली जलगाव येथील राहणारे शरणाप्पा मदगुणकी यांनी आपली हिरो होंडा मोटारसायकल दापोली एसटी स्टँड आवारात उभी करून ठेवली त्याची चावी गणेश कम्युनिकेशन मोबाइल शॉपीत दिली आपला मित्र कृष्णा घुगे ही गाडी नेण्यास आला कि त्याला चावी द्या असे दुकानदाराला सांगितले प्रत्यक्षात अज्ञात इसमाने दुकानदारांकडे आपण त्याचा मित्र आहे असे खोटे सांगून चावी घेतली व मोटारसायकल पळवून नेली .
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button