चालक, वाहकांना चार महिने मोफत पास: परिवहनच्या संचालक मंडळाचा निर्णय.

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसचालक, वाहकांच्या मोफत प्रवास पासच्या कालावधीत दोन महिने वाढीचा सकारात्मक निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. पूर्वी दोन सत्रात प्रत्येकी एकेक महिन्याचा पास दिला जात होता.आता एका सत्रात प्रत्येकी दोन महिने मोफत प्रवास पास दिला जाणार आहे. त्यामुळे त्यांना कुटुंबासह चार महिने फिरता येणार आहे.

पूर्वी एसटी कर्मचाऱ्यांना वर्षभरात जानेवारी ते जून व जुलै ते डिसेंबर या दोन सत्रांमध्ये दोन महिने मोफत प्रवासाची सुविधा मिळत होती. मात्र, ता त्यांना चार महिन्यांचा पास मिळणार आहे. पासची कालावधी वाढविण्याची कर्मचाऱ्यांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी होती. त्यानुसार महामंडळाने त्यात दोन महिन्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. महामंडळाच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांतही आनंदाचे वातावरण आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button