जैतापूरच्या सचिन नारकर यांनी स्वखर्चाने बसवले सीसीटीव्ही कॅमेरे

0
222

सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे गुन्हेगारीला वचक बसून कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी सामाजिक हेतूने जैतापूर येथील नारकर एजन्सीचे मालक सचिन नारकर यांनी संपूर्ण बाजारपेठेत सोळा सीसीटीव्ही कॅमेरे स्वखर्चाने बसविले

सागरी महामार्गाला लागून जैतापूरची बाजारपेठेत आहे. जवळच जैतापूर बंदर जेटी आहे. या जेटीवर अनेक परप्रांतीय खलाशी म्हणून काम करतात त्यामुळे अनेक गुन्हे घडत असतात. स्थानिक नागरिकांना सुरक्षितता लाभावी या हेतूने नारकर यांनी स्वखर्चाने सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला. यामुळे ही बाजारपेठ सुरक्षित झाली आहे. नारकर यांनी राबवलेल्या आदर्श उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here