गुद्दा -मुद्द्यांवरून राष्ट्रवादीची पत्रकार परिषद गाजली
राष्ट्रवादी -काँग्रेस आघाडीचे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार सुदेश मयेकर यांनी आज उमेदवारीबाबत माहिती देण्यासाठी काँग्रेस भवनमध्ये पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत बोलताना उमेदवार मयेकर यांनी आपण ही निवडणूक मुद्द्यावर लढवणार आहे गुद्यावर नाही असे म्हटले परंतु कोणी गुद्यावर आले तर आम्ही तसेच गुद्याने उत्तर देऊ असे त्यानी सांगितले .यावर उपस्थित पत्रकाराने आपणआज गांधी जयंती साजरी केली आणि गांधीजींनी अहिंसेचीशिकवण दिली तेव्हा पण गुद्याची कशी भाषा करता असे विचारले त्यावर मयेकर यांनी आपण गांधीजींच्या शिकवणीने जात आहाेत गांधीजींनी सत्यांची शिकवण दिली आज तालुक्यात अनेक ठिकाणी दहशतीचे वातावरण निर्माण केली जात आहे त्याला विरोध करणे हे आमचे काम आहे आज लालबहादूर शास्त्री यांचीही जयंती आहे त्यानीही युद्ध करून शत्रूला धडा शिकविला होता. समोरच्याने तशी गुद्याची भाषा केली तर त्याला तसे उत्तर देणे हे चुकीचे नाही .आपण उमेदवार म्हणून नवीन आहे पण खेळाडू जुना आहे असेही मयेकर यांनी सांगितले.
www.konkantoday.com