
भाजप रत्नागिरी शहराध्यक्षपदी सचिन करमरकर
रत्नागिरी भाजपच्या रत्नागिरी शहराध्यक्षपदी भाजपचे तरुण तडफादार सचिन करमरकर यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केली. भाजपच्या जिल्हा संपर्क कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात श्री. करमरकर यांनी नियुक्तीचे पत्र व पुष्पगुच्छ देऊन पटवर्धन यांनी सत्कार केला. या कार्यक्रमाला भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अॅड. बाबा परुळेकर, ज्येष्ठ नेते अॅड. विलास पाटणे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सचिन वहाळकर, मावळते शहराध्यक्ष प्रशांत डिंगणकर, जिल्हा उपाध्यक्ष राजेश सावंत, तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे आदींसह भरपूर कार्यकर्ते उपस्थित होते. नूतन शहराध्यक्ष सचिन करमरकर यांनी सांगितले की, माजी पंतप्रधान कै. अटल बिहारी वाजपेयी यांच्या व भाजपच्या विचारसरणीमुळे अनेक वर्षे भाजपचे काम करत आहे. कार्यकर्ता म्हणून सर्व कामगिरी करत असून आता शहराध्यक्षपदाची जबाबदारी प्राप्त झाली आहे. नेतृत्वाने जो विश्वास माझ्यावर दाखवला आहे तो नक्कीच सार्थ ठरवू. तसेच भाजपचे शहरामध्ये संघटन वाढवण्यासाठी प्रभाग समित्या आणखी बळकट करू. या वेळी जिल्हाध्यक्ष अॅड. पटवर्धन यांनी करमरकर यांचे अभिनंदन करून आगामी विधानसभा निवडणूक, नगराध्यक्ष पोटनिवडणूक यामध्ये भाजपची ताकद दाखवून देण्याकरिता मार्गदर्शन केले. भाजपचे सध्या 6 नगरसेवक असून भविष्यात ही संख्या दुप्पट कशी होईल, याकडे लक्ष द्यावे, अशी सूचना केली. या कार्यक्रमाला रत्नागिरी शहरातील भाजपचे सर्व नगरसेवक-नगरसेविका, अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच सर्वांनी शुभेच्छा देऊन लागेल ते सहकार्य देऊ, अशी ग्वाही दिली.
__________________________
*आता चला महा बचतीच्या दिशेने*
माई हुंडाई मधून आजाच सेंट्रो सीएनजी कार खरेदी करून करा महाबचत
9922949540,9206202122