
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी घेतली भेट
रत्नागिरी: भारतीय जनता पार्टी रत्नागिरी दक्षिणचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी ग्राम विकास मंत्री आ. जयकुमार गोरे यांची मुंबई येथे भेट घेतली. जिल्हा परिषद, ग्रामीण भागातील विकासाच्या संदर्भात व ग्रामीण भागातील विविध प्रश्नांबाबत भारतीय जनता पार्टी म्हणून मंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी वेगवेगळ्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मंत्री महोदयांनी भाजप शिष्टमंडळाने मांडलेल्या प्रश्नांची दखल घेतली असून लवकरच रत्नागिरी येथील समस्यांबाबत मार्ग काढला जाणार असल्याचे सांगितले आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्याला लवकरच भेट देणार असल्याचे देखील मंत्री महोदयांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांना आश्वस्त केले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, मंडल अध्यक्ष विवेक सुर्वे, मंडल अध्यक्ष विनोद म्हस्के, मंडल अध्यक्ष प्रतीक देसाई, उमेश देसाई, सुशांत पाटकर, मंदार खंडकर आधी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.