चौपदरीकरणासाठी चिपळुणातली ५९ बांधकामे पाडली
मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या रुंदीकरणासाठी चिपळूण बहादूरशेख नाका येथील बांधकामे पाडण्यास सुरुवात झाली.पोलीस बंदोबस्तात ही बांधकामे पाडण्यात येत आहेत खोकेधारक ,टपरी, संरक्षण भिंती” शेड आदी ५९ बांधकामे हटविण्यात आली. महामार्ग विभाग व कंत्राटदार चेतन कंपनी यांच्यावतीने ही मोहीम सुरू होती. या रुंदीकरणात येणाऱ्या मोठ्या इमारती व घरांना स्वतःहून बांधकामे हटवण्याच्या सूचना देण्यात आले आहेत.चौपदरीकरणाच्या कामासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आलेआहे.
www.konkantoday.com