बनावट एटीएम कार्डद्वारे ९७ हजारची फसवणूक
बँक ऑफ इंडियाच्या खात्यातील बनावट एटीएम कार्डचा उपयोग करून ९७ हजार रुपये अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना घडली आहे.हा प्रकार शिरगाव चिपळूण येथे घडला यातील फिर्यादी आदेश किलजे यांचे बँक ऑफ इंडियाचे खाते आहे.कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांच्या एटीएम कार्डचे डुप्लिकेट कार्ड तयार करून त्याचा पासवर्ड मिळवून फिर्यादीच्या खात्यातील ९७,५०० काढून घेतले. बँकेकडून अकाऊंटमधील रक्कम काढून घेतल्याचा मेसेज आल्यानंतर प्रकार फिर्यादीच्या लक्षात आला त्यामुळे त्यांनी आपली फसवणूक झाल्याची तक्रार अलोरे शिरगाव पोलीस स्थानकात दाखल केली आहे.
www.konkantoday.com
________________________
*पंचमी*
खवय्यांच्या आपुलकीचे,चविष्ट नाते पंचमीचे. . . . .
चटकदार लसूण चटणी ॥ लज्जतदार शेंगदाणा चटणी
सर्वत्र उपलब्ध
02352-221841
________________________