
दारू पिण्यास मनाई केली म्हणून रिक्षाचालकांच्या डोक्यात दारूची बाटली फोडली
रिक्षातून प्रवास करणाऱ्या प्रवाशाला दारू पिण्यास मनाई केली म्हणून राग आलेल्या प्रवाशाने रिक्षाचालकांच्या डोक्यात दारूची बाटली फोडून त्याला जखमी केले .हा प्रकार खेड येथे घडला.रिक्षाचालक रवींद्र भालेकर हे सुभाष चव्हाण या प्रवाशाला घेऊन जात असता चव्हाण यांनी रिक्षात दारू पिण्यास सुरुवात केली त्याला रिक्षाचालक भालेकर याने आक्षेप घेतला चव्हाण याने रागाच्या भरात भालेकरांच्या डोक्यात दारूची बाटली घालून त्यांना जखमी केले .
www.konkantoday.com