
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्याचे राजकीय वातावरण तापू लागले
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्याचे राजकीय वातावरण तापू लागले आहे. रत्नागिरी पंचायत समितीच्या गणांसाठी महायुतीमधील शिवसेनेने (एकनाथ शिंदे गट) आपली उमेदवारांची यादी जाहीर केली असून, यामध्ये अनुभवी कार्यकर्त्यांसह नव्या चेहर्यांनाही संधी देण्यात आली आहे.
शिवसेना नेते ना. उदय सामंत यांनी रत्नागिरी पंचायत समितीसाठी उमेदवाराच्या नावांची घोषणा केली आहे. गणनिहाय जाहीर झालेले उमेदवारांमध्ये वाटद- कळझोंडी- गणातून अनुष्का अभय खेडेकर, देऊड- नेहा प्रविण गावणकर, करबुडे – प्रविण धोंडू पांचाळ, कोतवडे- नेवरे पूर्वा सचिन दुर्गवळी, कोतवडे- स्वप्नील सदानंद मयेकर, झाडगाव (साखरतर) – परेश रामकृष्ण सावंत, झाडगाव- साक्षी परेश कुमठेकर, खेडशी- वैभव विठोबा पाटील, केळये-सुमेश सुरेश आंबेकर, हातखंबा- विद्या विलास बोंबले, नाणीज- डॉ. पद्मजा संजय कांबळे, नाचणे- सचिन सुधाकर सुपल, कर्ला – कांचन कृष्णकांत नागवेकर, गोळप- फणसोप- अर्चना तुषार साळवी, सुशिक्षित चेहर्याला मैदानात उतरवण्यात आले आहे. महायुतीमधील घटक पक्षांशी चर्चा करून ही यादी अंतिम करण्यात आल्याचे समजते. या घोषणेमुळे आता ग्रामीण भागात प्रचाराला वेग येणार असून, विरोधकांकडून (मविआ) कोणाला उमेदवारी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.www.konkantoday.com




