१ ऑक्टोबरला अंजनी स्थानकादरम्यान कोकण रेल्वेचा ब्लॉक

कोकण रेल्वे मार्गावरील खेड व चिपळूण या स्थानकांदरम्यान अजनी स्थानक येथे कोकण रेल्वे प्रशासनाने विद्युतीकरणाच्या कामानिमित्त लूप लाईन टाकण्यासाठी दिनांक ०१-१०-२०१९ रोजी 17.00hrs ते 24.00 hrs या दरम्यान ब्लॉक जाहीर केला आहे.या कालावधीत या मार्गावरील वाहतूक बंद असणार आहे असे कोकण रेल्वेने जाहीर केले आहे.
________________________

*पंचमी*
खवय्यांच्या आपुलकीचे,चविष्ट नाते पंचमीचे. . . . .

*_चटकदार लसूण चटणी ॥ लज्जतदार शेंगदाणा चटणी_*

सर्वत्र उपलब्ध
02352-221841
________________________
या ब्लॉकमुळे १२०५२ मडगाव-दादर जनशताब्दी एक्सप्रेस याच्या वेळेमध्ये बदल करण्यात आला आहे.ही गाडी दि.01-10-19ला मडगाववरून 13.45hrsला (दीड तास उशिराने) सुटणार आहे.तसेच १२६१९ लोकमान्य टिळक-मेंगळुरू सेंट्रल मत्सगंधा एक्सप्रेस,५०१०३ दादर रत्नागिरी पॅसेंजर,२२११३ लोकमान्य टिळक कोचिवली एक्सप्रेस,११००४ सावंतवाडी रोड दादर तुतारी एक्स्प्रेस,१०११२ मडगाव मुंबई सीएसटीएम कोकणकन्या एक्सप्रेस या गाड्या उशिराने धावणार असून या कालावधीत या गाड्या विविध स्थानकांवर थांबवून ठेवण्यात येणार आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button