राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राज्यात आक्रमक,कडेकोट पोलीस बंदोबस्त
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने शिखर बँक प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. आपण स्वतः दोन वाजता ईडीच्या कार्यालयात जाणार असल्याचे त्याने जाहीर केले आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शांतता राखावी असेही आवाहन त्यांनी केले आहे . असे असले तरी राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरत आहेत अनेक ठिकाणी कार्यकर्ते रस्त्यात उतरून निषेध व्यक्त करीत आहेत .काहीठिकाणी कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर मुंबईकडे येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गाड्या बाहेर थांबविण्यात आले आहेत. ईडीच्या कार्यालय परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून जमावबंदी आदेश देण्यात आला आहे. शरद पवार यांनी ईडी कार्यालयात जाऊ नये अशी पोलिसांकडून विनंती केली जात आहे मात्र शरद पवार आपल्या निर्णयावर ठाम आहेत.ईडीकडून ही आम्ही पवारांना आज चौकशीसाठी बोलावलेले नाही असे सांगण्यात येत असून आम्ही जेव्हा बोलवू तेव्हा त्यांनाचौकशीला यावे लागेल असे सांगितले आहे. त्यामुळेआज पवार यांना चौकशी संदर्भातले कोणी अधिकारी भेटणार नसल्याचे ईडीकडून सांगण्यात येत आहे .
www.konkantoday.com