शिवाजी स्टेडियममधील अकरा गाळेधारकांना आचारसंहितेमुळे दिलासा
तीन वर्षांपूर्वी मुदत संपलेल्या छत्रपती शिवाजी स्टेडियममधील अकरा गाळेधारकांवर कारवाई करावी असा ठराव रत्नागिरी नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत झाला होता .करार संपूनही रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रशासनाकडून या गाळेधारकांकडून जुन्या दराने भाडे वसुली सुरू होती.याबाबत शिवसेनेचे नगरसेवक निमेश नायर यांनी हा प्रश्न सभागृहात उपस्थित केला होता. त्यावर सभागृहाने हे गाळे सील करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानंतर प्रशासनाने कोणतीच हालचाल केली नाही दरम्याने विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्याने आता कोणतीही कारवाई करता येणार नाही असे प्रशासनाचे म्हणणे आहे. यामुळे गाळेधारकांना आचारसंहितेमुळे महिनाभर दिलासा मिळाला आहे.
—————————–
*माई हुंडाई रत्नागिरीमधून सेंट्रो सीएनजी कार खरेदी करा आणि पेट्रोल दरवाढीची चिंता सोडा संपर्क-9922949540,9206202122*
—————————-
www.konkantoday.com