
त्यामुळे अकरावी प्रवेशासाठीची सीईटी परीक्षा कशी घेणार ? उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केला सवाल 11th admission
राज्यात कोरोना प्रतिबंधक निर्बंध पूर्णपणे हटवलेले नाहीत. लोकल प्रवास सामान्यांसाठी खुला करण्यात आलेला नाही. त्यामुळे अकरावी प्रवेशासाठीची सीईटी परीक्षा कशी घेणार ? असा सवाल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केला. राज्यात इयत्ता अकरावी प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेदरम्यान न्यायालयाने वरील भाष्य केले.
www.konkantoday.com