
शिखरं बँक घोटाळा प्रकरणात शरद पवारांचे कोठून आले माहित नाही -अण्णा हजारे
शिखर बँक घोटाळ्या
संदर्भात करण्यात आलेल्या सुमारे वीस चौकशी अहवालात शरद पवार यांचे कोठेही नाव नाही, असे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) पवार यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी अण्णा हजारे यांनी आश्चर्य व्यक्त केले.
अण्णा हजारे यांनी म्हटले की राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकारणात शरद पवारांचे नाव कसं आलं मला माहीत नाही.