वनविभागाच्या पिंजऱ्यात बिबट्या काही येईना !

मध्यंतरी पावस गणेशगुळे व आजूबाजूच्या परिसरात बिबट्याने ग्रामस्थांवर हल्ला करण्याचे प्रकार केले होते. या बिबट्याला पकडण्यात यावे अशी ग्रामस्थांनी मागणी केल्यानंतर बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरे तसेच कॅमेरेही लावले होते.मात्र त्या ठिकाणी बिबट्या काही फिरकला नाही.यामुळे वनविभागाच्या पिंजऱ्यात व कॅमेरात बिबट्या काही सापडू शकला नाही. या बिबट्याला कसे पकडायचे हे वन विभागाला आव्हानच ठरले आहे. बिबट्या जाळ्यात यावा यासाठी वनविभागाने या भागात गस्तही सुरू केली होती. परंतु त्यालाही बिबट्याने हुलकावणी दिली आहे. यामुळे या भागातील ग्रामस्थांची बिबट्याच्या भीती पासून अद्याप सुटका झालेली नाही.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button