
बाबुराव जोशी ग्रंथालयास आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुणवत्ता प्रमाणपत्र
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी संचालित गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या .
बाबुराव जोशी ग्रंथालयालाआंतरराष्ट्रीय स्तरावरील आयएसओ गुणवत्ता प्रमाण प्राप्त झाले आहे. १९४५साली ग्रंथालयाची स्थापना झाली होती. ग्रंथालयात अत्याधुनिक सुविधांचा वापर करण्यात येत आहे.ग्रंथालय पूर्ण संगणीकृत असून बारकोडिंग प्रक्रिया पूर्ण झाली आहे.या प्रक्रियेद्वारे विद्यार्थी प्राध्यापकांना पुस्तकांची देवघेव केली जाते. आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रमाणपत्र प्राप्त झाल्याबद्दल सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन प्राचार्य किशोर सुखटणकर यानी शुभेच्छा दिल्या. ग्रंथपाल किरण धांडोरे व उत्पल वाकडे यांनी हे प्रमाणपत्र स्वीकारले.
www.konkantoday.com