पदवीदान सोहळ्यात आता भारतीय संस्कृतीनुसार पोशाख ,मुंबई विद्यापीठाचा निर्णय
मुंबई विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यात आता इंग्रजांच्या चाली रीतीनुसार विद्यार्थी घालत असलेला काळा झगा आणि काळी टोपी हा पोशाख यापुढे दिसणार नाही. त्याऐवजी भारतीय संस्कृतीनुसार पोशाख आणण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे. मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या या निर्णयाचे हिंदू जनजागृती समितीने अभिनंदन केले आहे. प्रत्येक देशाची ओळख त्या देशाच्या संस्कृतीने वृद्धिंगत होत असते असे समितीचे म्हणणे आहे.
www.konkantoday.com