
चार्जिंगला लावलेला मोबाइल चोरट्याने लांबविला
घराच्या खिडकीत चार्जिंग करण्यासाठी लावण्यात आलेला मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेला .खेड अडखळ येथील राहणारे सलिम हाेडेकर यांनी आपला सात हजार रुपये किमतीचा मोबाइल खिडकीत चार्जिंगसाठी लावला होता. त्यांची नजर चुकवुन चोरट्याने हा मोबाइल चोरून नेला.याबाबत त्यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
www.konkantoday.com