
आम्हाला कुणबी मराठा असे प्रमाणपत्र नको, मराठा म्हणूनच आरक्षण मिळावे, कुणबी मराठा प्रमाणपत्राला संमत्ती नाही
आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आदोलनाला रत्नागिरी जिल्हा क्षत्रिय मराठा समाजाचा पाठिंबा आहे. मात्र आम्हाला कुणबी मराठा असे प्रमाणपत्र नको, मराठा म्हणूनच आरक्षण मिळावे, अशी आमची मागणी असून पुढार्यांना बंदी करणार नाही, असा एकमुखी ठराव झाल्याची माहिती मराठा समाजाचे प्रतिनिधी राजेंद्र घाग व सुधीर भोसले यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे येथील शांताई रिसॉर्ट येथे रविवारी जिल्ह्यातील क्षत्रिय मराठा समाजाच्या मुख्य प्रतिनिधींची बैठक झाली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी झालेल्या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती दिली. सुरूवातीला गुहागरचे ऍड. संकेत घाग यांनी या बाबतची भूमिका स्पष्ट केली. यानंतर मराठा प्रतिनिधी राजन घाग यांनी बैठकीतील निर्णय सांगितले. आमचा मराठा समाज उन्नत व प्रगत कसा होईल आणि तो वेगळ्या दिशेने कसा मार्ग करेल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि त्यासाठी आम्ही संघटना बांधत आहोत. यामध्ये कोणताही राजकीय हेतू नाही. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र नको, अशी आमची ठाम भूमिका आहे. मात्र, मराठा हेच आम्हाला प्रमाणपत्र मिळावे व कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण सरकारने द्यावे, अशी आमची आग्रही मागणी आहे. कुणाचेही सरकार असो, आम्हाला त्यांच्याशी काहीही देणेघेणे नाही. केवळ आरक्षण हवे आहे.
www.konkantoday.com