
एमआयडीसी मिरजोळे परिसरात भटक्या कुत्र्यांच्या झुंडी ,पादचारी व दुचाकी वाल्यांना धोका
रत्नागिरी शहरातील कांचन हॉटेलजवळ एमआयडीसी रस्त्यावर मोकाटभटक्या कुत्र्यानीथैमान घातले असून या कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी रस्त्यावर फिरत आहेत. या रस्त्यावरून शाळकरी मुले व अनेक स्कूटर स्वार नेहमी ये जा करीत असतात. हे कुत्रे एकत्र झुंडीने फिरत असल्यामुळे अचानक मध्ये आल्याने दुचाकी चालकांचा अपघात होण्याची शक्यता आहे. याशिवाय या भटक्या कुत्र्यांमुळे त्या रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांनाही या कुत्र्यांपासून धोका आहे. अनेक वेळा हे कुत्रे दुचाकीसमोर येत असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. याशिवाय रात्रीच्या वेळी हे कुत्रे दिसले नाहीत तर ते दुचाकी चालकांच्या दृष्टीने धोकादायक आहेत.अनेकवेळा कुत्र्यानी चावा घेतल्याचे प्रकारही घडत असल्याने या पादचारी भीतीखाली आहेत.या मोकाट भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त संबंधित यंत्रणेने करावा अशी नागरिकांची मागणी आहे.
www.konkantoday.com