भारती डिफेन्स कंपनीच्या गोडावूनमधून पावणे दोन लाख रुपयांचा ऐवज चोरीला

0
245

रत्नागिरीजवळील मिऱया बंदर येथे भारती डिफेन्स अँड इन्फास्ट्रक्चर या कंपनीच्या गोडाऊनमध्ये चोरी होऊन चोरट्यांनी पावणे दोन लाखांचा ऐवज चोरून नेला.

कंपनीच्या वतीने फिर्याद दाखल करण्यात आली असून फिर्यादी गॉडविन नराेना यांनी याबाबत पोलीस स्थानकात चोरीची तक्रार दाखल दाखल केली आहे. मिऱया बंदर येथे कंपनीचे गोडावून असून या गोडाऊनचा पत्रा वाकवून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला. आतमध्ये ठेवण्यात आलेले बावीस तांब्याचे पाईप, कार्पेट असा पावणे दोन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here