
पर्यटकांच्या सुरक्षितेसाठी गणपतीपुळे ग्रामपंचायतीने केली नवी उपाययोजना
जगाच्या पर्यटन नकाशावर महत्त्वाचे असलेल्या समुद्रात गेल्या काही वर्षात अनेक पर्यटक बुडाल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत व घडत आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करावी अशी मागणी सातत्याने होत आहे. यासाठी आता गणपतीपुळे ग्रामपंचायतीनेच पुढे येऊन पाऊल उचलले आहे.या किनार्यावरील काही भाग पोहण्यास धोकादायक आहे. टेहळणी मनोरा क्रमांक एक ते मंदिर परिसर हा भाग धोकादायक दाखविला असून त्या ठिकाणी लाल झेंडे व छोटे लाल खांब उभे करून पर्यटकांना हा भाग धोकादायक असल्याचे सुचवण्यात आले आहे.या भागात पर्यटकांनी पोहण्यासाठी उतरू नये असा त्यातून इशारा देण्यात आला आहे.टेहळणी मनोरा क्रमांक एक ते एमटीडीसी समुद्र परिसर पोहण्यासाठी सुरक्षित आहे.हा भाग पोहण्यासाठी सुरक्षित असल्याचे दर्शविण्यासाठी या ठिकाणी पिवळे झेंडे उभे करण्यात आले आहेत.पर्यटकांनी देखील संयम दाखवून ग्रामपंचायतीने सुचवलेल्या सूचनांचे पालन केले तर दुर्घटना टळू शकणार आहेत.याशिवाय गणपतीपुळे ग्रामपंचायतीने जीवरक्षकांची पुन्हा नियुक्ती केली आहे. त्यामुळे या किनाऱ्यावर आता दहा जीवरक्षक कार्यरत होणार आहेत.पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी गणपतीपुळे ग्रामपंचायतीने जे पाऊल उचलले आहे त्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
www.konkantoday.com