प्रकल्पग्रस्तांची भेट घेऊन मते जाणून घेणार,आम्ही त्यांच्यासोबत -आमदार नितेश राणेंची भूमिका
रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणार रिफायनरीबाबत पुनर्विचार करण्याचे संकेत दिले याबाबत आता आमदार नीतेश राणे यांनी देखील आपली भूमिका जाहीर केली आहे. येथील भूमिपुत्र व स्थानिकांनी या प्रकल्पाला विरोध केला होता त्यामुळे आम्ही या लोकांच्या बाजूने उभे राहिलो होतो आता लोकांचे प्रकल्पाबाबतची भूमिका बदलली असेल तर त्यांची भूमिका आम्ही जाऊन जाणून घेऊ त्यांची मते विचारात घेऊ. माझ्या मतदारसंघातील काही गावे या प्रकल्पात येत आहेत.त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आपण योग्य ते पाऊल उचलू अशी आपली भूमिका त्यांनी जाहीर केली.
www.konkantoday.com