
सखी सह्याद्रीमध्ये शिल्पा पटवर्धन यांची विशेष मुलाखत
रत्नागिरी मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील सखी सह्याद्री कार्यक्रमात शुक्रवारी 20 सप्टेंबर रोजी येथील रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष शिल्पाताई पटवर्धन यांची विशेष मुलाखत होणार आहे. या मुलाखतीचे थेट प्रसारण (लाईव्ह) 20 सप्टेंबरला सकाळी 11.30 ते 12.30 या वेळेत होणार आहे. सूत्रसंचालन मृण्मयी भजक करणार आहेत. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून शिल्पाताई शैक्षणिक विकासाकरिता योगदान देत आहेत. त्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट मेंबर आहेत. समाजकारण, राजकारण, महिला संघटन अशा विविध क्षेत्रात आदर्शवत आणि उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल यशस्विनी शीर्षकाअंतर्गत सह्याद्री वाहिनीने त्यांची विशेष मुलाखत आयोजित केली आहे. या मुलाखतीचे पुनःप्रसारण आज रात्री 11 वाजता सह्याद्री वाहिनीवरून करण्यात येणार आहे.
www.konkantoday.com