सहा वर्षांच्या लहान मुलांबरोबर लैंगिक चाळे करणाऱ्याला अटक
सहा वर्षांच्या लहान मुलांबरोबर लैंगिक चाळे करणाऱ्या भावेश वरू वय ४३ यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. रत्नागिरी शहरातील मारूती मंदिर परिसरात प्रकार घडला या सोसायटीत सदर इसम राहतो
याबाबत पीडित मुलाच्या पालकांनी पोलिसांना तक्रार दाखल केली आहेत या तक्रारीत सदरचा आरोपी लहानग्या मुलांबरोबर लैंगिक चाळे करून तसेच त्याच्याकडून लैंगिक चाळे करून घेत होता याबाबत सदरचा मुलगा शाळेत मित्रांना सांगत असताना शिक्षकांच्या कानावरहा प्रकार आला त्यांनी मुलांच्या पालकांच्या कळवल्यावर मुलाकडे चौकशी केली असता धक्कादायक प्रकार उघड झाला याबाबत मुलाच्या पालकानी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. रत्नागिरीसारख्या सुसंस्कृत शहरातही असे प्रकार घडू लागल्याने खळबळ उडाली आहे.
www.konkantoday.com