शिवसेनेत होत असलेल्या अन्यायामुळे दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी घेतली मुख्यमंत्र्यांकडे धाव
पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्यावर भगतगिरीचा आरोप करून खळबळ उडवून देणारे दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी महायात्रेच्या निमित्याने रत्नागिरीत आलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतल्याने हा विषय चर्चेचा झाला आहे.
आपणावर शिवसेनेत होत असलेल्या अन्यायाबाबत आपण आपली बाजू मुख्यमंत्र्यांकडे मांडली असल्याचे त्यांनी सांगितले तसेच दापोलीतील विकासकामांचे प्रश्न त्यांच्यासमोर मांडल्याचे त्यांनी सांगितले.
गेली अनेक वर्षे शिवसेनेकडून आमदार पद भूषवणाऱ्या दळवी यांना नंतरच्या विधानसभा निवडणुकीत डावलण्यात आले. त्यानंतर गेली काही वर्षे दळवी व कदम असा वाद सुरू झाला होता.दळवी यांनी शिवसेनेत झालेल्या अन्यायाबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन नेमके काय साध्य केले असा प्रश्न उपस्थित होत आहे. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्याकडून गेली काही वर्षे दळवी यांना डावलले जात आहे त्यामुळे ते नाराज आहेत.यावेळी ते विधानसभेसाठी इच्छुक असूनही रामदास कदम यांनी आपले चिरंजीव योगेश कदम यांचे नाव या मतदार संघातून शिवसेनेतर्फे निश्चित केले आहे.यामुळेच गेल्या काही दिवसात सुर्यकांत दळवी व रामदास कदम यांच्यात शाब्दिक आरोप प्रत्यारोप होत आहेत.याबाबत शिवसेनेच्या वरिष्ठांनी देखील तटस्थेची भूमिका घेतली आहे. यामुळे नाराज झालेल्या दळवी यांनी शिवसेनेत होत असलेल्या अन्यायाबाबत भाजपच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असल्याने ते भाजपच्या वाटेवर जाणार की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
www.konkantoday.com