जिल्हा कौशल्य आराखड्यात राष्ट्रीय स्तरावर देशातील सात आराखड्यात रत्नागिरीची निवड
संकल्प प्रकल्पांच्या अंमलबजावणीचा उद्देश म्हणून केंद्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाने जुन १८ मध्ये देशभरातून सर्व जिल्ह्यातून उत्कृष्ट कौशल्य विकास आराखडे सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्याप्रमाणे जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता कार्यालय रत्नागिरीचे सहायक संचालक सुनील पवार यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात कौशल्य विकास आराखडा करून पाठविला होता त्याची देशातील निवडक पंचवीस जिल्ह्यांमध्ये निवड झाली होती. त्यातून केलेल्या छाननीत राष्ट्रीय पातळीवर सात आराखडय़ांची निवड केली असून त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश आहे.या निवडीमुळे दक्षिण कोरियाच्या कौशल्य विषय अभ्यास दौऱ्यात जाणाऱ्या शिष्टमंडळात रत्नागिरीची निवड झाली आहे.
www.konkantoday.com