गुहागरमधून निवडणूक लढवणार ,भास्करराव जाधव यांचा निर्धार

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर चिपळूणमध्ये आगमन झालेल्या भास्करराव जाधव यांनी आपण शिवसेनेतर्फे गुहागर मतदार संघातूनच निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे.काल त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी करून त्यांचे स्वागत केले.त्यावेळी त्यांच्या समर्थकांनी मिरवणूक काढली आपण संघर्षाला घाबरत नाही गुहागर,खेड येथे मेळावा घेऊन सर्वांचे एकदा मनोमिलन केले कि आपण मतदारसंघाच्या बाहेर राज्यात दानपट्टा चालवायला मोकळे आहोत असेही त्यानी सांगितले.माननीय उद्धवजीनी देखील आपल्याला गुहागरमध्ये अडकून न ठेवता राज्यात फिरायचे असे सांगितले आहे.माझी योग्यता असेल तसे पक्षप्रमुख निर्णय घेतील.भास्कर जाधव यांच्या वक्तव्यामुळे गुहागरची जागा शिवसेना आपल्याकडे ठेवणार असे सध्या तरी दिसत आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button