
लांजा शिक्षण संस्थेचे चेअरमन हाजी अब्दुल कादीर रखांगी यांचे निधन
लांजा:लांजा न्यू एज्युकेशन सोसायटीचे माजी चेअरमन, सामाजिक कार्यकर्ते हाजी अब्दुल कादीर याकूब रखांगी (९२) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.लांजा शहरातील प्रतिष्ठीत नागरिक, सामाजिक कार्यकर्ते अशी त्यांची ओळख होती. लांजा तालुका दूध डेअरी सेवा संस्थेचे अध्यक्ष, लांजा तालुका कुक्कुटपालन संस्थेचे सक्रीय पदाधिकारी म्हणून धोंडूशेठ रखांगी कार्यरत होते. सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेले धोंडूशेठ रखांगी हे कॉंग्रेस, मुस्लिम समाजातील जुने जाणते कार्यकर्ते होते.
www.konkantoday.com